कोव्हिड - 19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांनी निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रथम वर्ष ते अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या नियमित व अनुशेषित विषयांच्या ऑनलाइन पद्धतीने परीक्षांचे नियोजित दि. 10 एप्रिल 2021 पासून करण्यात आले आहे. याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे व सुचना खालीलप्रमाणे. 1. प्रथम वर्ष ते अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या नियमित, अनुशेषित व रिपीटर (Regular / Backlog / Repeaters Subjects) परीक्षांचे नियोजन ऑनलाइन पद्धतीने दिनांक 10 एप्रिल, 2021 पासून करण्यात आले आहे. या परीक्षा फक्त ऑनलाइन प्रॉक्टर्ड बहुपर्यायी प्रश्नाद्वारे (MCQ), एक तासाची परीक्षा अशा पद्धतीने घेण्यात येतील. या परीक्षा एकूण 50 गुणांच्या एक तास कालावधीच्या राहतील. यासाठी 60 MCQ दिले जातील त्यामधून 50 प्रश्नांची अचूक उत्तरे ग्राह्य धरण्यात येतील. 2. सदर परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या www. unipune.in या संकेतस्थळावर टप्प्याटप्याने प्रसिद्ध करण्यात येत आहे. 3. विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत SMS व E - Mail id द्वारे अवग...