ऑक्टोंबर / नोव्हेंबर 2020 सत्रातील (नियोजित एप्रिल / मे 2021) पुणे विद्यापीठ परीक्षांचे आयोजन ऑनलाइन करण्याबाबतचे मार्गदर्शक तत्त्वे व सूचना.

     कोव्हिड - 19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांनी निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रथम वर्ष ते अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या नियमित व अनुशेषित  विषयांच्या ऑनलाइन पद्धतीने परीक्षांचे नियोजित दि. 10 एप्रिल 2021 पासून करण्यात आले आहे. याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे व सुचना खालीलप्रमाणे. 

1. प्रथम वर्ष ते अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या नियमित, अनुशेषित व रिपीटर (Regular / Backlog / Repeaters Subjects) परीक्षांचे नियोजन ऑनलाइन पद्धतीने दिनांक 10 एप्रिल, 2021 पासून करण्यात आले आहे. या परीक्षा फक्त ऑनलाइन प्रॉक्टर्ड बहुपर्यायी प्रश्नाद्वारे (MCQ), एक तासाची परीक्षा अशा पद्धतीने घेण्यात येतील. या परीक्षा एकूण 50 गुणांच्या एक तास कालावधीच्या राहतील. यासाठी 60 MCQ दिले जातील त्यामधून 50 प्रश्नांची अचूक उत्तरे ग्राह्य धरण्यात येतील.
 
2. सदर परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या www. unipune.in या संकेतस्थळावर टप्प्याटप्याने प्रसिद्ध करण्यात येत आहे.
 
3. विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत SMS व E - Mail id द्वारे अवगत करण्यात येईल. मात्र यासाठी विद्यार्थ्यांचा  मोबाईल क्रमांक व E - Mail id कार्यान्वित असणे आवश्यक आहे.
 
4. ऑनलाइन परीक्षेत काही तांत्रिक कारणाने खंड पडल्यास तेवढाच कालावधी संबंधित विद्यार्थ्याला संगणकीय प्रणालीतून वाढवून दिल जाईल. यापूर्वी सोडविलेली उत्तरे जतन होऊन तेथून पुढे परीक्षा सुरू होईल तसेच परीक्षेदरम्यान काही अडचणी आल्यास (020) 71530202 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
 
5. ऑनलाइन परीक्षेची संपूर्ण माहिती होण्यासाठी मुख्य परिक्षेपूर्वी  दिनांक 05 एप्रिल, 2021 ते 9 एप्रिल, 2021 सकाळी 10 ते दुपारी 3 या कालावधीत सराव परीक्षांचे  (Mock Test) आयोजन करण्यात येईल व तसे सर्व संबंधितांना अवगत करण्यात येईल. 

6. दिव्यांग विद्यार्थ्यांना शासन निर्णयाप्रमाणे सोई व सवलती देय राहतील. तसेच या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 20 मिनिटे अधिकचा वेळ देय राहील. 

7. या परीक्षा विभागाचे परिपत्रक क्र . 4 / 2021 दि. 16 मार्च, 2021 रोजी प्रसिद्ध केल्याप्रमाणे संबंधित अभ्यासक्रमावर होतील. तसेच अभियांत्रिकी 2015 पॅटर्नच्या प्रथम वर्षाच्या प्रथम सत्रातील अनुशेषित विषयांच्या परीक्षा या 100 % अभ्याससक्रमावर आधारीत असतील.
 
8. गणित व संख्याशास्त्र अभ्यासक्रमातील विषयांच्या परीक्षा MCQ पद्धतीने प्रत्येकी 2 गुणांसाठी 30 प्रश्न या पद्धतीने विचारण्यात येतील. विद्यार्थ्यांनी दिलेली 25 प्रश्नांची अचूक उत्तरे ग्राह्य धरण्यात येतील.
 
9. सर्व विद्यार्थ्यांना विषयात मिळालेले  गुण (Online Score) ही परीक्षेनंतर 48 तासात Student Profile System मध्ये उपलब्ध करून देण्यात येतील. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पुढील 48 तासाच्या आत अडचणी व  शंका असल्यास तेथेच नोंदवावी, Student Profile System मध्ये नोंदविलेल्या तक्रारीच ग्राह्य धरण्यात येतील व त्यानंतर कोणत्याही सबाबिवर तक्रार स्वीकारली जाणार नाही.
 
10. प्रत्येक विद्यार्थ्याला ऑनलाइन परीक्षा पूर्ण केल्याची पोहोच (Acknowledgement) दिसेल सदर बाबीचा स्क्रीन शॉट / फोटो / प्रिंट विद्यार्थ्यांनी आपल्याकडे जतन करून ठेवणे आवश्यक आहे.
 
11. सदर परीक्षेसाठी  विद्यार्थ्यांनी sppuexam.in या संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच परीक्षांबाबत सूचना, उपयोगकर्ता पुस्तिका व व्हिडिओ याच संकेतस्थळावर उपलब्ध असतील. 

⍟ अधिक माहितीसाठी :

➤ अधिकृत वेबसाइट : 👉पहा 

➤ अधिकृत परिपत्रक : 👉पहा 

Comments

Popular posts from this blog

ठाणे महानगरपालिकेत स्टाफ नर्स पदाची भरती - 2021(TMC)

भारतीय स्टेट बैंक में क्लर्क (SBI Clerk) 5121 पदों के लिए महाभारती [मुदतवाढ]

इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेच्या सरावाकरिता संपूर्ण विषयाचे प्रश्नसंच उपलब्ध