प्रसिद्धीपत्रक - परीक्षेच्या वेळी शारीरिक / परस्पर अंतराच्या (Social Distancing) अनुषंगाने करावयाची कार्यवाही / उपाययोजना

 

क्रमांक :-  एमआयएस-०६१५/सीआर-१८/२०२०/तीन दिनांक :  १९ मार्च, २०२१

कोव्हीड - 19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांकरीता आयोगाकडून विहित करण्यात आलेल्या माणक कार्यप्रणाली (Standard Operating Procedure - SOP) नुसार उमेदवारांना खालीलप्रमाणे सूचित करण्यात येत आहे :-

  1. परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रवेश करतांना किमान तीन पदरी कापडाचा मुखपट (मास्क) परिधान करणे अनिवार्य आहे.
  2. परीक्षा कक्षामध्ये मुखपट (Mask), हातमोजे व सॅनिटाईझरची लहान पिशवी (Pouch) असलेले प्रत्येकी एक किट उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचा वापर दोन्ही सत्राकरीता (असल्यास) करणे अनिवार्य आहे.
  3. परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्वछता (Cleanliness) तसेच आरोग्यास हितावह (Hygienic) वातावरण राखण्यासाठी हात सतत सॅनिटाईझ करणे आवश्यक आहे.
  4. कोव्हिड - 19 सदृश्य लक्षणे जसे ताप, सर्दी, खोकला इत्यादी दिसून येत असल्यास संबंधित परीक्षा उपकेंद्रावरील पर्यवेक्षकीय अधिकारी / कर्मचारी यांना आगाऊ कळवावे. अशा उमेदवारांना मुखपट (Mask), हातमोजे, फेस शिल्ड, मेडिकल गाऊन, मेडिकल शु कव्हर, मेडिकल कॅप, इत्यादी बाबी समाविष्ट असलेले पिपीई किट उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच, त्यांची स्वतंत्र परीक्षा कक्षामध्ये बैठक व्यवस्था करण्यात येईल.
  5. शारीरिक / परस्पर अंतर राखण्याच्या अनुषंगाने परीक्षा उपकेंद्रावरील उचित माहिती फलक, सांकेतिक चिन्हे, भित्तिपत्रिका इत्यादी वरील सूचनांचे कटाक्षाने पालन करावे.
  6. परीक्षा संपल्यानंतर परीक्षा उपकेंद्राबाहेर जाताना शारीरिक / परस्पर अंतर राखणे उमेदवारांना अनिवार्य आहे.
  7. वापरलेले टिश्यु पेपर, मास्क, हातमोजे, सॅनिटाईझ पाऊच, इत्यादी वस्तू परीक्षा उपकेंद्रावरील आच्छादित कुंडीमध्ये टाकावेत.
  8. कोव्हिड - 19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या सर्व सूचना / आदेश यांचे काटेकोरपणे पालन करावे.

शारीरिक / परस्पर अंतराच्या अनुषंगाने वरीलप्रमाणे व प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सूचनांचे उमेदवारांनी काटेकोरपणे पालन करावे.

अधिक माहितीसाठी : 👉येथे क्लिक करा


Comments

Popular posts from this blog

ITI - औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश प्रक्रिया 2021

भारतीय स्टेट बैंक में क्लर्क (SBI Clerk) 5121 पदों के लिए महाभारती [मुदतवाढ]

डिप्लोमा अभ्यासक्रम 10वी नंतर प्रथम वर्ष प्रवेश प्रकिया 2021-22