प्रसिद्धीपत्रक - MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 च्या आयोजनाबाबत
संदर्भ : शासन पत्र, आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभाग,
क्रमांक : आव्यप्र-/प्रक्र५५/आव्यप्र-१, दिनांक १० मार्च, २०२१
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) रविवार दिनांक १४ मार्च, २०२१ रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० च्या आयोजनसंदर्भात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मुदत व पुनर्वसन विभागाकडून दिनांक १० मार्च, २०२१ रोजीच्या पत्राद्वारे आयोगास खालीलप्रमाणे कळविण्यात आले आहे.
"राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांना निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात यावी."
२. शासनाकडून घेण्यात आलेल्या उपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने विषयांकित राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० ही पुढे ढकलण्यात येत आहे.
३. प्रस्तुत परीक्षेचा सुधारित दिनांक यथावकाश जाहीर करण्यात येईल.
अधिक महितीसाठी : प्रसिध्दीपत्रक पहा

Comments
Post a Comment