CMAT 2021 परीक्षेची तारीख जाहीर
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट (CMAT) परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. ही परीक्षा ३१ मार्च रोजी होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १२ / १२.३० आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ / ६.३० अशी दोन सत्रात परीक्षा होणार आहे. ज्या उमेदवारांनी CMAT परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, ते एनटीएच्या संकेतस्थळावर जाऊन परीक्षेचे वेळापत्रक पाहू शकतात.
या परीक्षेचे अॅडमिट कार्ड २४ मार्चला जारी केलं जाणार आहे. यासंबंधीचं परिपत्रक एनटीएने जारी केलं आहे. त्यात असं म्हटलंय की, 'अॅडमिट कार्ड २४ मार्च २०२१ रोजी सकाळी १० वाजण्यापूर्वी जारी केली जाण्याची शक्यता आहे. उमेदवारांनी यासंबंधीच्या अपडेटसाठी www.nta.ac.in आणि https://cmat.nta.nic.in/ या संकेतस्थळांना भेट द्यावी.'
उमेवारांनी ध्यानात घ्यावे की कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्टसाठी 'Innovation and Entrepreneurship' हे सेक्शन नव्याने जोडण्यात आलं आहे. या सेक्शनचा पर्याय निवडण्याची संधी उमेदवारांना देण्यात आली होती. हे सेक्शन निवडणार्या विद्यार्थ्यांना अर्धा तास अतिरिक्त वेळ देण्यात येणार आहे.
CMAT 2021 Admit Card : कसं करायचं डाऊनलोड ?
- सर्वात आधी अधिकृत वेबसाईट cmat.nta.nic.in वर जा.
- "Download CMAT 2021 admit card" लिंक वर क्लिक करा.
- विचारलेली माहिती भरा आणि सबमीट करा.
- अॅडमिट कार्ड आता तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीन वर दिसू लागेल.
- आता अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआऊट घेऊ ठेवा.
अधिकृत वेबसाइट : 👉पहा
Comments
Post a Comment