CICSE Board : इयत्ता 10 वीची परीक्षा 5 मे आणि 12 वीची परीक्षा 8 एप्रिलपासून सुरू होणार


                  इयत्ता 12 वीच्या बहुतांश परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत घेतल्या जाणार आहे. तर दहावीच्या बहुतेक परीक्षा सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होतील.

नवी दिल्ली : काऊंसिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने दहावी (ICSE) आणि बारावी (ISC) परीक्षा 2021 च्या तारखांची घोषणा केली आहे. इयत्ता दहावीची परीक्षा 5 मे पासून आणि इयत्ता 12 वीची परीक्षा 12 एप्रिलपासून सुरू होईल.

आयसीएसई वर्ग 12 वी 

आयसीएसई बोर्ड वर्ग 12 अर्थात आयएससी बोर्ड परीक्षा 8 एप्रिल पासून सुरू होईल.

8 एप्रिल- संगणक विज्ञान पेपर -2 चे व्हावहारीक नियोजन सत्र होणार आहे 

9 एप्रिल - गृह विज्ञान आणि भारतीय संगीत पेपर -2 चे प्रात्यक्षिके होतील. 

05 मे - व्यवसाय अभ्यास परीक्षेपासुन बोर्डाची लेखी परीक्षा सुरू होईल.

परीक्षा दुपारी अडीच ते सायंकाळी पाच या वेळेत सुरू होतील.

काही पेपेरच्या परीक्षा सकाळी 9 वाजेपासून होणार आहे.

आयसीएसई वर्ग 10 वी 

सीआयएससीई इयत्ता 10 वी म्हणजे आयसीएसई (ISCE) परीक्षा 05 मे पासून सुरू होणार आहेत.

पहिल्या दिवशी इंग्रजी भाषा पेपर -1 ची परीक्षा घेण्यात येईल. 

सीआयएससीईच्या दहावीच्या परीक्षा सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होतील.

काही पेपर च्या परीक्षा सकाळी 9 वाजता घेतल्या जातील.

दोन्ही वर्गाच्या परीक्षेची वेळापत्रके आयसीएसई बोर्डाची अधिकृत वेबसाइट cisce.org वर उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

अधिकृत वेबसाइट


Comments

Popular posts from this blog

ITI - औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश प्रक्रिया 2021

भारतीय स्टेट बैंक में क्लर्क (SBI Clerk) 5121 पदों के लिए महाभारती [मुदतवाढ]

डिप्लोमा अभ्यासक्रम 10वी नंतर प्रथम वर्ष प्रवेश प्रकिया 2021-22