राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षा वेळापत्रकात बदल

• राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षा आता 25 एप्रिल ऐवजी 23 मे 2021 रोजी होणार.

    


    महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत घेण्यात येणार्‍या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) या परीक्षा दिनांक 25 एप्रिल, 2021 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली होती मात्र या परीक्षा आता 23 मे, 2021 रोजी घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त शैलजा दराडे यांनी जाहीर केले आहे.

    सदर परीक्षेसाठी शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाइन आवेदनपत्र भरणे करिता शाळांना दि. 30 मार्च, 2021 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. तथापि परीक्षा परिषदेने त्यात बदल करून त्याकरिता दि. 10 एप्रिल, 2021 पर्यंत द्वितीय मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सदर परीक्षेकरिता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाइन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दि. 10 एप्रिल, 2021 अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी.

 अधिक महितीसाठी :

➤ अधिकृत वेबसाइट : 👉पहा 

➤ सुधारित वेळापत्रक : 👉पहा 



Comments

Popular posts from this blog

ठाणे महानगरपालिकेत स्टाफ नर्स पदाची भरती - 2021(TMC)

इयत्ता 10 वी व 12 वी परीक्षेच्या सरावाकरिता संपूर्ण विषयाचे प्रश्नसंच उपलब्ध

भारतीय स्टेट बैंक में क्लर्क (SBI Clerk) 5121 पदों के लिए महाभारती [मुदतवाढ]