प्रसिद्धीपत्रक - महावितरण कंपनीमध्ये "विद्युत सहाय्यक" व "उपकेंद्र सहाय्यक" पदांची 7000 भरती



महावितरण कंपनीमध्ये "विद्युत सहाय्यक" व "उपकेंद्र सहाय्यक" या पदांची तब्बल ७००० पदे भरली जाणार आहेत अशा आशयाचे संदेश विविध प्रसार माध्यमातून प्रसारित होत आहेत. त्या अनुषंगाने कळविण्यात येते की, सन २०१९ मध्ये जाहिरात क्र. ०४/२०११ व जाहिरात क्र. ०५/२०१९ ही अनुक्रमे "विद्युत सहाय्यक" (५००० पदे) व "उपकेंद्र सहाय्यक" (२००० पदे) अशा एकूण ७००० पदांकरीता प्रसिद्ध करण्यात आली होती. सद्यस्थितीत महाराष्ट्र शासन निर्णय दि. २३/१२/२०२० अन्वये सदर जाहिराती अंतर्गत केवळ ज्या उमेदवारांनी एस.ई.बी.सी. प्रवर्गातून अर्जं सादर केले होते, अशा उमेदवारांना "खुला" अथवा "ई.डब्ल्यू.एस." प्रवर्गाचा विकल्प स्वीकारणेकरिताची URL लिंक कंपांनीच्या संकेतस्थळावर दि. २०/०३/२०२१ पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तथापि, महावितरण कंपनीद्वारे सन २०२१ मध्ये कोणतीही नवीन पदे भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. 
महावितरण कंपांनीमधील पद भरतीबाबतच्या सेवायोजन जाहिराती ह्या कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mahadiscom.in) प्रसिद्ध होतात. त्या अनुषंगाने निवेदन करण्यात येते की, उमेदवारांनी पद भरतीबाबत जाहिरातीसाठी कंपांनीच्या संकेतस्थळाचे अवलोकन करावे. तसेच इतर माध्यमातून प्राप्त बनावट जाहिराती अथवा संदेश यावर विश्वास ठेवू नये.





Comments

Popular posts from this blog

ITI - औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश प्रक्रिया 2021

भारतीय स्टेट बैंक में क्लर्क (SBI Clerk) 5121 पदों के लिए महाभारती [मुदतवाढ]

डिप्लोमा अभ्यासक्रम 10वी नंतर प्रथम वर्ष प्रवेश प्रकिया 2021-22