प्रसिद्धीपत्रक - राज्य सेवा पूर्व परीक्षा-2020 सुधारित दिनांकाबाबत
संदर्भ : आयोगाचे समक्रमांकाचे दिनांक 11 मार्च, 2021 रोजीचे प्रसिद्धीपत्रक.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक 14 मार्च, 2021 रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा - 2020 च्या आयोजनासंदर्भात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत पुनर्वसन विभागाकडून दिनांक 10मार्च, 2021 रोजीच्या पत्राद्वारे प्राप्त सूचनांनुसार सदर परीक्षा आयोगाच्या संदर्भिय प्रसिद्धीपत्रकाद्वारे पुढे ढकलन्यात आली होती. प्रस्तुत परीक्षा रविवार, दिनांक 21 मार्च, 2021 रोजी आयोजित करण्यात येईल.
रविवार, दिनांक 14 मार्च, 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेकरिता आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे उमेदवारांना वितरित करण्यात आलेल्या प्रवेश प्रमाणपत्रांच्या आधारे प्रवेश प्रमाणपत्रामध्ये नमूद परीक्षा उपकेंद्रावर संबंधित उमेदवारला प्रवेश देण्यात येईल.
शनिवार, दिनांक 27 मार्च, 2021 रोजी आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा - 2020 तसेच रविवार, दिनांक 11 एप्रिल, 2021 रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट - ब संयुक्त पूर्व परीक्षा - 2020 या दोन परीक्षा नियोजित दिनांकास घेतल्या जातील. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
अधिक महितीसाठी : 👉प्रसिद्धीपत्रक पहा

Comments
Post a Comment