RTE अॅक्ट नुसार नर्सरी व 1 ली 25% मोफत प्रवेश

   


                   

अर्ज स्वीकृतीस 3 मार्च पासून सुरुवात होईल 

पात्रता :

वंचित गटांतील अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, सर्व जाती धर्मातील विकलांग बालके तसेच दुर्बल घटकामध्ये ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. एक लाखापर्यंत असणारे खुल्या प्रवर्गासह विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास वर्ग व धार्मिक अल्पसंख्यांक (मुस्लिम, बौद्ध, ख्रिचन, पारसी, जैन व शीख.)

आवश्यक कागदपत्रे : ( नंबर लागल्यास सादर करण्यासाठी )

आवश्यक कागदपत्रे :

* रहिवासी पत्त्याचा पुरावा 

* जन्माचा दाखला 

*  कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला 

*  वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र ( आवश्यक असल्यास )

*  बालक दिव्यांग असल्यास ४० % पेक्षा आधीक अपंगत्व असल्याचे जिल्हा शल्यचिकिस्तक / वैद्यकीय अधिक्षक यांचे प्रमाणपत्र ( आवश्यक असल्यास )

*  बालकाचे पालक घटस्पोटीत असल्यास न्यायालयाचा निर्णय / घटस्फोट प्रकरण न्यायप्रवीस्ट असल्याचा पुरावा 

*  बालकाचे वडील हयात नसल्यास बालकाच्या वडिलांचे मृत्यूपत्र ( आवश्यक असल्यास ) 

*  बालक अनाथ असल्यास सांभाळ करत असतील त्यांचे हमीपत्र/अनाथलयाची कागदपत्रे (आवश्यक असल्यास) 

                                         महत्वाची सूचना

*  शाळेच्या आरंभीच्या वर्गाच्या २५% प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सोडत / लॉटरी पद्धतीने प्रवेश दिले जातील. अशा परिस्थितीत प्रत्येक अर्जदाराच्या पाल्यास प्रवेश मिळेलच असे नाही.

*  आरटीई २५ % अंतर्गत एखाद्या शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर कोणत्याही कारणास्तव शाळा बलदून मिळत नाही.

*  मा. न्यायालयाच्या निर्णयानुसार विजा अ, भज ब, भज क, भज ड, इमाप्र, विमाप्र, तसेच एचआयव्ही बाधित / एचआयव्ही प्रभावित गटातील बालकांच्या पालकांना उत्पानाच्या दाखल्याची आवश्यकता भासणार नाही मात्र जात प्रमाणपत्र / एचआयव्ही बाधित / एचआयव्ही प्रभावित असल्यास तसे जिल्हा शल्य चिकिस्तक / समकक्ष अधिकार्‍यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.

अधिकृत वेबसाईट : पहा 

            अर्ज स्वीकृतीचा अंतिम दिनांक - २१ मार्च २०२१ पर्यंत  


Comments

Popular posts from this blog

ITI - औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश प्रक्रिया 2021

भारतीय स्टेट बैंक में क्लर्क (SBI Clerk) 5121 पदों के लिए महाभारती [मुदतवाढ]

डिप्लोमा अभ्यासक्रम 10वी नंतर प्रथम वर्ष प्रवेश प्रकिया 2021-22